कोल्हापूर : सरकारसोबत राहण्याचा निर्णय घेऊन खासदार धैर्यशील माने यांनी विकासाला साथ दिली आहे. त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी राज्य सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे राहील. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ , अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. शिंदे गटात दाखल झाल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील शिवसेनेने आज माने यांच्या निवास स्थानावर मोर्चा काढला होता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलेली भेट महत्त्वाची मानली जाते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आज सकाळी खासदार माने यांनी नवी दिल्ली येथे भेट घेऊन पंचगंगा प्रदूषण शेतकरी कर्जमाफी या संदर्भात माझ्याशी चर्चा केली. दोन्ही विषय लवकर मार्गी लावले जातील. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न माझ्यासमोर मांडले आहेत . एक निश्चित कृती आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने अडीच वर्षात सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी माजी खासदार निवेदिता माने यांनी त्यांचे स्वागत केले. खासदार संजय मंडलीक ,माजी आमदार अमल महाडिक , डॉ.सुजीत मिणचेकर, सांगली जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार , मकरंद देशपांडे, रवींद्र माने विजयसिंह माने, समीत कदम, आदी उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stand mp mane chief minister decision to development ysh
First published on: 25-07-2022 at 21:08 IST