scorecardresearch

सुजित चव्हाण, रवींद्र माने शिंदे गटाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या बांधणीस सुरुवात झाली आहे.

सुजित चव्हाण, रवींद्र माने शिंदे गटाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख
सुजित चव्हाण, रवींद्र माने शिंदे गटाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या बांधणीस सुरुवात झाली आहे. सुजित रामभाऊ चव्हाण व रवींद्र माने यांची जिल्हाप्रमुखपदी निवड केल्याचे बुधवारी सांगण्यात आले.

 सुजित रामभाऊ चव्हाण यांच्याकडे कोल्हापूर उत्तर, दक्षिण व करवीर या तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या समर्थक म्हणून ओळखले जातात. इचलकरंजीचे माजी नगरसेवक रवींद्र माने यांच्याकडे हातकणंगले, शाहूवाडी, इचलकरंजी, शिरोळ या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते खासदार धैर्यशील माने यांचे समर्थक आहेत. अन्य निवडी नंतर करण्यात येणार आहेत.

ठाणे मुख्यालय

 आनंद आश्रम, भवानी चौक, टेंभी नाका, ठाणे असा जिल्हाप्रमुखांच्या नियुक्ती पत्रावर उल्लेख आहे. सध्या हेच आमचे मुख्यालय असल्याचे स्पष्टीकरण यावेळी करण्यात आले.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या