बेळगावात मराठी-कन्नड भाषकांत संघर्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : मराठेशाहीच्या इतिहासात शौर्यगाथा गाजविणारे तानाजी मालुसरे यांच्या शूर कथेवर आधारित ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचे कोल्हापुरात जल्लोषात स्वागत झाले. तर, बेळगावमध्ये कन्नड भाषकांनी या चित्रपटाचे पोस्टर चित्रपटगृहावरून काढून टाकून चित्रपट बंद करण्याच्या घोषणा दिल्या. याला तोडीस तोड उत्तर देत मराठी भाषकांनी नवा फलक चित्रपटगृहावर लावून सिनेरसिकांना तानाजी चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली.

अजय देवगण यांचा बहुचर्चित तानाजी हा चित्रपट शुक्रवारी येथील पद्मा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अजय देवगणचा हा शंभरावा चित्रपट असल्याने त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच चित्रपटगृहाबाहेर लावलेल्या भव्य फलकावरील तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेस यांना मोठा हार अभिवादन केले. या वेळी या रसिकांनी छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे यांचा जयघोष केला आणि अजय देवगण यास शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, बेळगाव येथे मात्र तानाजी चित्रपट प्रदर्शित होत असताना कन्नड भाषक संघटनेच्या कार्यकर्त्यांंनी ग्लोब चित्रमंदिर येथे जाऊ न पोस्टर काढून टाकले. चित्रपट बंद करण्याच्या घोषणा दिल्या. चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांवर दादागिरी केली. कन्नडिगांच्या दादागिरीमुळे बेळगाव, धारवाड, दावणगिरी येथे या चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडण्याचा प्रयत्न करीत कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांंनी मराठी द्वेषाचे दर्शन घडवले.

तानाजी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने बेळगावातील मराठी भाषकांनी समाज माध्यमावर या चित्रपटाच्या स्वागताच्या पोस्ट शेअर केल्या होत्या. आज त्यांनी कन्नड संघटनेच्या दादागिरीचा निषेध नोंदवला. यावर न थांबता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांंनी ग्लोब चित्रपटगृहात जाऊ न तानाजी चित्रपटाचे भव्य पोस्टर पुन्हा लावले. तानाजी मालुसरे यांचा जयघोष करीत या चित्रपटाचा आस्वाद घेतला. या निमित्ताने बेळगाव सीमाभागात पुन्हा एकदा मराठी भाषक आणि कन्नडिंग यांच्यातील संघर्ष झाल्याचे दिसून आले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanhaji the unsung warrior movie warm welcome in kolhapur zws
First published on: 11-01-2020 at 03:45 IST