पन्हाळगगडावरून शिवज्योत आणत असताना झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.तर एकजण जखमी झाला. अक्षय पाडळकर आणि संतोष पाटील अशी मयत तरुणांची नावे आहेत. ते येथील कदमवाडी आणि भोसलेवाडी परिसरात राहत होते.

हेही वाचा- “भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून उद्धव ठाकरेंना धडा शिकवला”; अमित शहांचा टोला

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या युवकांचा रजपुतवाडी जवळ अपघात झाला. दुचाकी एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात आले. संतोष व अक्षय या दोघांचा मृत्यू झाला. तर निलेश संकपाळ हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शिवजयंतीच्याच दिवशी ही घटना घडल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.