कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमण प्रश्नी मुख्यमंत्री आणि माजी खासदार संभाजी राजे यांचे चर्चा घडवून आणावी अशी सूचना आम्ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना घटनेपूर्वी केली होती. तथापि, राज्य शासन, प्रशासन आणि पोलिसांनी कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य खबरदारी गांभीर्याने घेतली नसल्याने विशाळगडची घटना घडली. हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे, असा आरोप खासदार शाहू छत्रपती यांनी केला आहे.

हेही वाचा >>> आम्ही उद्या विशाळगडला जाणार; कोणीही रोखू नये- सतेज पाटील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशाळगड संदर्भात पत्रका द्वारे खासदार शाहू छत्रपती यांनी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, राज्य सरकारने अतिक्रमण काढण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला रविवारी जे आदेश दिले तेच यापूर्वी दिले असते तर ही घटना टळली असती. या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. संभाजीराजे यांच्या आक्रमक भूमिके नंतर हिंसाचार झाला त्याचा निषेध करतो. नुकसान झालेल्यांना शासनाने  भरपाई द्यावी. उद्या मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार आहोत. अतिक्रमणे सरसकट काढण्याची कारवाई करावी, त्याबाबत दुजाभाव केला जाऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.