मिरवणुका, सभा-बैठका, त्यांना लाभलेली सेलिब्रिटींची उपस्थिती अशा वातावरणात मंगळवारी करवीरनगरीत महिलादिन उत्साहात पार पडला. महसूल प्रशासनाच्या वतीने महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्ववर्गणी काढून अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शिल्लक राहिलेला १६ हजारांचा निधी महिलादिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांच्याकडे दुष्काळ निधीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस सुपूर्द केला.  केशवराव भोसले नाटय़गृहात सिनेतारका डिम्पल कपाडिया यांची उपस्थिती होती.
महिला आíथक विकास महामंडळ (माविम) कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र तळसंदे, नशाबंदी मंडळ, कोल्हापूर आणि ज्योती स्कील्स अँड सíव्हसेस ८ मार्च जागतिक महिलादिनानिमित्त बचतगटातील महिलांचा मेळावा शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता.
बचतगटांच्या माध्यमातून महिला राजकारणात येत आहेत. त्यांची आíथक, सामाजिक, राजकीय उन्नती होत आहे. बचतगटांच्या माध्यमातून क्रियाशील झालेल्या महिलांनी सामाजिक जाणिवेतून जिल्ह्याला लागलेला स्त्रीभ्रूणहत्येचा कलंक पुसण्यासाठी प्रयत्न करावेत. असे सांगून जिल्ह्यातील स्त्री-पुरुष िलग गुणोत्तर वाढवण्यासाठी बचतगटांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन सनी यांनी केले.
पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे म्हणाले, महिलांना ज्या वेळी असुरक्षित वाटत असेल त्या वेळी प्रतिसाद द्या या कोल्हापूर पोलीस विभागाने नुकत्याच सुरू केलेल्या मोबाइल अॅप्लिकेशनचा वापर करावा. कुलगुरू देवानंद िशदे यांच्या मातोश्री नागरबाई बाबुराव िशदे यांचा आदर्शमाता म्हणून गौरव करण्यात आला.
जागतिक महिलादिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि राजाराम महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राजाराम महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या महिलादिन कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी दीपप्रज्वलनाने केले. या कार्यक्रमास जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नी डॉ. अंशू सनी, प्राचार्य वसंत हेळवी, ज्येष्ठ अनुवादिका सुप्रिया वकील, मनीषा खत्री या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
महिला अधिकाऱ्यांनी आपल्या पारदर्शी आणि कार्यतत्पर प्रणालीतून अधिक कार्यक्षम आणि आत्मनिर्भरतेने काम करण्यास सक्रिय व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी केले.
ज्येष्ठ अनुवादिका सुप्रिया वकील या प्रसंगी म्हणाल्या, महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची खरी गरज आहे. महिला या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या असून, त्या सक्षम आणि कार्यक्षम आहेत.