येथे देशी दारू दुकानाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाअंतर्गत रविवारी दुपारी आंदोलनकर्त्यां महिलांनी तळीरामांना येथेच्छ चोप दिला. त्यावर न थांबता त्यांनी त्यांचे कपडे फाडले. महिलांचा रुद्रावतार पाहून अन्य मद्यपींनी तेथून पळ काढला. या अनोख्या आंदोलनाची शहरात चर्चा होती.
इचलकरंजीतील शिवाजीनगर परिसरात देशी दारू दुकान कायमस्वरूपी बंद करावे या मागणीसाठी महिलांचे गेल्या १४ दिवसांपासून विविध मार्गाने आंदोलन सुरू आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही दखल न घेतल्याने महिलांनी आता मद्यपींना रोखण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.