इचलकरंजी येथील काळा ओढा परिसरात मंगळवारी संजीवकुमार उर्फ शुभम चंद्रकांत ठोंबरे (वय २३ रा. साखरपे हॉस्पिटल जवळ) याचा मृतदेह आढळाला. महालक्ष्मी अपार्टमेंटलगत गटारीत मृतदेह आढळला. खिशातील आधारकार्डवरून मिळाले ओळख पटली. संजीवकुमार याच्या डोक्यास मागे मोठी व गंभीर जखम आहे. संजीवकुमार इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. वर्षभरापासून आईच्या आजारपणामुळे त्याने शिक्षण थांबवले होते. तो आईची देखभाल करीत होता. औषधोपचार व उदरनिर्वाहासाठी तो एका संगणक संस्थेत अर्धवेळ नोकरी करीत होता. काल कामावरून न परतल्याने नातेवाइकांनी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार केली . मृतदेहाच्या खिशात चिठ्ठी आढळून आली आहे. त्यामध्ये त्याने माझ्या मृत्यूस कोणीही जबाबदार नसून मी नराश्येतून हे कृत्य करीत आहे. माझ्या पश्चात माझ्या आईची काळजी घ्यावी असे नमूद केले आहे.