शाहीद आफ्रि दीकडून मला नेहमीच अयोग्य वागणूक मिळायची. त्यानेच माझी एकदिवसीय कारकीर्द लवकर संपुष्टात आणली, असा आरोप पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दिनेश कनेरियाने केला आहे.

दिनेश २००० ते २०१० या कालखंडात १८ एकदिवसीय सामने खेळू शकला. ‘‘मी एकदिवसीय सामने फार खेळू शकलो नाही, याचे एकमेव कारण म्हणजे आफ्रि दी. तो अन्य खेळाडूंना पाठबळ द्यायचा, पण मला नव्हे. ११ जणांच्या संघात दोन फिरकी गोलंदाज कशाला? असा सवाल विचारला जायचा. त्यामुळे संघाचा नियमित सदस्य असतानाही मला अंतिम संघनिवडीत डावलले जायचे. बऱ्याचदा माझे क्षेत्ररक्षण चांगले नाही, असा शिक्काही मारला जायचा,’’ असे दिनेशने सांगितले.