विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सामना करणाऱ्या भारतीय संघाने आश्वासक सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर संपवत भारताने दिवसाअखेरीस १ बाद ३६ पर्यंत मजल मारली. या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेची शैली, त्याने गोलंदाजीत केलेले बदल आणि फिल्डींग प्लेसमेंट या सर्व गोष्टी चर्चेचा विषय बनल्या.

इतकच नव्हे तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपल्यानंतर अजिंक्य रहाणेने पदार्पणाच्या कसोटीत सामन्यात २ बळी घेणाऱ्या मोहम्मद सिराजला टीम लिड करण्याची संधी देत त्याचा सन्मान केला. सोशल मीडियावर हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या कृतीसाठी अजिंक्य रहाणेचं कौतुक केलंय.

याआधीही अजिंक्य रहाणेने अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात विजयानंतर पराभूत झालेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडूंना टीम इंडियासोबत फोटो काढण्याची संधी देत आपलं वेगळेपण सिद्ध केलं होतं.