अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यात आश्वासक खेळ करत आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. अजिंक्य रहाणेचं शतक, जाडेजाचं अर्धशतक, बुमराह-आश्निनचा भेदक मारा यामुळे हा सामना आतापर्यंत भारताने गाजवला. परंतू तिसऱ्या पंचांनी दिलेल्या दोन निर्णयांमुळे या सामन्याला वादाची किनार लाभली आहे.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनची बॅट क्रिजवर असूनही त्याला तिसऱ्या पंचांनी नाबाद ठरवलं होतं. आयसीसीच्या नवीन नियमांनुसार फलंदाजाची बॅट क्रिजच्या पुढे असणं गरजेचं असतं. परंतू तरीही तिसऱ्या पंचांनी पेनवर मेहेरनजर केल्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं होतं. परंतू भारतीय संघाच्या पहिल्या डावात तिसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणेला अशाच परिस्थितीत तिसऱ्या पंचांनी बाद ठरवलं. ज्यामुळे तिसऱ्या पंचांच्या पक्षपातीपणावर सोशल मीडियावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा- मेलबर्नचं मैदान अजिंक्यने गाजवलं, विराट कोहलीला टाकलं मागे

आणखी वाचा- अजिंक्य रहाणेचं शतक भारतीय क्रिकेटच्या इतिहासातलं सर्वात महत्वपूर्ण – सुनिल गावसकर

अष्टपैलू रविंद्र जाडेजा आपल्या अर्धशतकापासून केवळ एक धाव दूर असताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी टिच्चून मारा करत त्याला एक धाव घेताना नाकीनऊ आणले. नॅथन लॉयनच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत असताना संभ्रमामुळे अजिंक्य रहाणे धावबाद झाला. परंतू यानंतरही अजिंक्य रहाणेने निराश न होता जाडेजाला प्रोत्साहन देत माघारी परतण पसंत केलं.