News Flash

बायका गेल्या शॉपिंगला, भारतीय खेळाडू करतायत ‘बेबीसिटींग’

अजिंक्य रहाणेने पोस्ट केला आश्विन-पुजारासोबतचा फोटो

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पहिल्या दोन वन-डे सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारत तिसऱ्या वन-डे सामन्यात व्हाईटवॉश टाळण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. भारताकडून कसोटी मालिका खेळणारे खेळाडू सध्या सरावात व्यस्त असून नुकतीच उप-कर्णधार अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रविचंद्रन आश्विन यांच्या खांद्यावर एक नवीन जबाबदारी आली होती.

खेळाडूंसोबत दौऱ्यावर असलेल्या बायकांनी एक दिवस आपल्या मुलींना सांभाळण्यातून सुट्टी घेत शॉपिंगला जायचा प्लान आखला आणि मुलींची जबाबदारी आपल्या पतींवर सोपावली. अजिंक्य रहाणेने पुजारा आणि आश्विनसोबतचा एक फोटो पोस्ट करत…पत्नी राधिकाला माझ्यासाठी काय आणतेयस हे पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.

वन-डे मालिका पार पडल्यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. यानंतर १७ डिसेंबरपासून ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. कर्णधार विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळून आपली पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी भारतात परतणार आहे. यावेळी अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचं नेतृत्व येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 1:48 pm

Web Title: ajinkya rahane pujara and ashwin taking care of their daughters while their wife goes for shopping psd 91
Next Stories
1 त्रिशतकी धावसंख्येचा पाठलाग करताना भारताला रोहितची गरज – आकाश चोप्रा
2 भारतीय संघाला रोहित-विराटव्यतिरीक्त सातत्याने धावा करणाऱ्या फलंदाजांची गरज – हरभजन सिंह
3 कोट्रेलच्या हातातून निसटलेला बॉल थेट ‘शॉर्ट थर्ड मॅन’च्या दिशेने, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल
Just Now!
X