पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या विश्वनाथन आनंदला कँडिडेट्स बुद्धिबळ स्पध्रेत सातव्या फेरीत नेदरलँडच्या अनिश गिरीने बरोबरीत रोखले.

या बरोबरीमुळे आनंदच्या खात्यात चार गुण जमा झाले असून तो दुसऱ्या स्थानावर आहे. १४ डावाच्या या स्पध्रेत मध्यंतरापर्यंत आनंदने दोन विजय मिळवले असून एका सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला आहे, तर चार लढती अनिर्णीत राहिल्या.