विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यातील लढत म्हणजे बुद्धिबळ चाहत्यांसाठी पर्वणी असते. अझरबैजानमधील शामकीर येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत आनंदला विश्वविजेत्या कार्लसनवर विजय मिळवण्याची संधी होती. मात्र मोक्याच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे आनंदला बरोबरीत समाधान मानावे लागले.
कार्लसनच्या हातून झालेल्या चुकीचा फायदा उठवत पाचवेळा विश्वविजेता आनंदने पॉन पोझिशन मिळवली. यावेळी आनंद विजयश्री मिळवणार अशी स्थिती होती. मात्र कार्लसनने चिवटपणे खेळ करत महत्त्वपूर्ण अर्धा गुण मिळवत आनंदला बरोबरी करण्यास भाग पाडले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Apr 2015 रोजी प्रकाशित
आनंदची कार्लसनशी बरोबरी
विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यातील लढत म्हणजे बुद्धिबळ चाहत्यांसाठी पर्वणी असते. अझरबैजानमधील शामकीर येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत आनंदला विश्वविजेत्या कार्लसनवर विजय मिळवण्याची संधी होती.
First published on: 18-04-2015 at 08:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand lets carlsen off the hook settles for a draw