आशिया चषकामध्ये आज बुधवारी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्यावर ५०० कोटींचा सट्टा लागला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना कायमच जगाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये हा सामना म्हणजे गौरवाचा विषय आहे. आजचा सामना कोण जिंकणार? यावर खमंग चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर आणि विविध कार्यालयांमध्ये तसेच ट्रेनमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

आजच्या सामन्यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार? यावर सट्टाबाजर गरम झाला आहे. संघामध्ये विराट कोहली नसतानाही सट्टेबाजारामध्ये बुकीजचा आवडता संघ भारत आहे. भारतीय संघाच्या विजयाची शक्यता ८० टक्के असल्याचा अंदाज सट्टेबाजारात व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भारतीय संघावरच सर्वाधिक पैसा सट्टेबाजांनी लावला आहे. नाणेफेकीपासून ते चौकार आणि विकेट पर्यंत सट्टाबाजार गरम झाला आहे.

भारतीय संघासाठी ७० पैसे भाव ठेवण्यात आला आहे. भारत जिंकल्यासा सट्टा लावणाऱ्यास एक रूपया ७० पैसे मिळतील. म्हणजे जर १०० रूपये भारतीय संघावर लावल्यास १७० रूपये मिळतील. पाकिस्तान संघाचा भाव १.४० रुपये आहे. पाकिस्तान जिंकल्यास सट्टा लावणाऱ्याला २.४० रूपये मिळणार आहेत.

असा आहे सट्टेबाजारात भाव

नाणेफेक – भारत ८२ पैसे, पाकिस्तान १.४२ रुपये
शिखर धवन – दोन रूपये २३ पैसे
रोहित शर्मा दोन रूपये ८९ पैसे
रायडू ३ रूपये ४० पैसे
केदार जाधव – ३ रूपये ९० पैसे
धोनी ४ रूपये ३० पैसे
शोएब मलिक – तीन २२ पेसे
सर्फराज अहमद – तीन रूपये ९० पैसे