इंडोनेशियातील आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये भारतीय महिलांना अखेर रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. उपांत्य फेरीत मलेशियावर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर भारतीय महिलांकडून पदकाची आशा केली जात होती. मात्र हाँग काँग विरुद्ध खेळताना भारतीय महिलांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. हाँग काँगने २-० च्या फरकाने सामना जिंकत सुवर्णपदक कमावलं.

भारतीय संघातील जोश्ना चिनप्पा, दिपीका पल्लीकल, सुनयना कुरुविल्ला आणि तन्वी खन्ना जोडीने अंतिम फेरीत प्रयत्नांची पराकाष्टा केली, मात्र हाँग काँगवर मात करणं त्यांना जमलं नाही. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी भारतीय पुरुषांना उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं.