05 August 2020

News Flash

Asian Games 2018 : बॉक्सर अमित पांघलचा गोल्डन पंच, उझबेगिस्तानच्या प्रतिस्पर्ध्यावर मात

बॉक्सिंगमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक

सुवर्णपदक विजेता अमित पांघल

इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या अखेरच्या दिवशी भारताने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ४९ किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर अमित पांघलने अंतिम फेरीत उझबेगिस्तानच्या हसनबॉय दुस्तमतॉवचा पराभव करुन सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. अखेरच्या दिवसात अमितने भारतासाठी मिळवलेलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. याचसोबत यंदाच्या स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारा अमित एकमेव बॉक्सर ठरला आहे.

जागतिक क्रमवारी आणि अनुभवामध्ये हसनबॉय हा अमितपेक्षा कित्येकपटीने उजवा खेळाडू होता, मात्र अमितने अंतिम सामन्यात हसनबॉयला आश्चर्यचकीत करुन टाकलं. पहिल्या डावात हसनबॉय अमितवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अमितने सुरक्षित अंतर राखत बचाव करण्याचा प्रयत्न केला. यामुळे हसनबॉयला गुण कमावता आले नाहीत. मात्र मधल्या वेळेत अमित संधी साधत हसनबॉय चांगले प्रहार केले. दुसऱ्या डावात अमितच्या आक्रमक खेळामुळे हसनबॉय थोडासा दडपणाखाली आलेला पहायला मिळाला. याचा फायदा घेत अमितने सामन्यावर आपली पकड मजबूत केली. तिसऱ्या सत्रात बचाव आणि आक्रमणाचा सुरेख मेळ साधत अमितने सामन्यात बाजी मारत भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर टाकली.

काल झालेल्या उपांत्य सामन्यात अमितने फिलीपाईन्सचा आपला प्रतिस्पर्धी कार्लो पालमवर मात केली होती. त्याआधी भारताच्या विकास क्रिशनला उपांत्य फेरीत दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्यामुळे कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 12:48 pm

Web Title: asian games 2018 indonesia india bags first gold medal in boxing amit panghal beat uzbekistan opponent
टॅग Asian Games 2018
Next Stories
1 Asian Games 2018 : स्वप्ना बर्मनच्या पायांना मिळणार आधार, Nike कंपनी बुटांचा खर्च उचलण्याच्या तयारीत
2 Youth Boxing Championship : साक्षी चौधरीला सुवर्णपदक; मनिषा-अनामिका जोडीला रौप्य
3 कडव्या झुंजीनंतर फेडरर तिसऱ्या फेरीत
Just Now!
X