स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली भारताचा दौरा करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात चांगली झालेली आहे. चेन्नईत बीसीसीआय अध्यक्षीय संघाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय संपादन केला आहे. तुलनेने नवख्या असलेल्या अध्यक्षीय संघावर कांगारुंच्या संघाने १०३ धावांनी मात केली. मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलिया संघाला ३०० धावसंख्येचा टप्पा ओलांडता आला.

अवश्य वाचा – भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया वापरणार ‘झॅम्पा’कार्ड!

ऑस्ट्रेलियाच्या संघातील ५ फलंदाजांनी सामन्यात अर्धशतक झळकावलं, तर दुसऱ्या डावात अॅश्टन अॅगरने ४ बळी घेतले. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३४८ धावांचा पाठलाग करताना अध्यक्षीय संघ २४४ धावांवर गारद झाला. ठराविक अंतराने अध्यक्षीय संघातले फलंदाज विकेट फेकत गेल्यामुळे यजमान संघ ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करु शकला नाही.

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलियाविरुद्ध धोनीनं केलेली कामगिरी विराटला जमणार का?

संक्षिप्त धावफलक –

ऑस्ट्रेलिया – ३४७/७
मार्कस स्टॉयनिस ७६, डेव्हिड वॉर्नर ६४, स्टिव्ह स्मिथ ५५, ट्रेविस हेड ६५, मॅथ्यू वेड ४५
वॉशिंग्टन सुंदर २/२३

बीसीसीआय अध्यक्षीय संघ – २४४ सर्वबाद
श्रीवत्स गोस्वामी ४३, मयांक अग्रवाल ४२
अॅश्टन अॅगर ४/४४

अवश्य वाचा – विराट ब्रिगेड ‘नंबर वन’साठी मैदानात उतरणार