08 July 2020

News Flash

ऑस्ट्रेलियाचा विंडीजवर एक डाव व २१२ धावांनी विजय

जेम्स पॅटिन्सनने पुनरागमन झोकात साजरे करताना पाच बळी घेण्याची किमया साधली.

जेम्स पॅटिन्सनने पुनरागमन झोकात साजरे करताना पाच बळी घेण्याची किमया साधली. त्यामुळे होबार्टच्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाने विंडीजवर एक डाव आणि २१२ धावांनी दणदणीत विजय साजरा केला.

वेस्ट इंडिजचा पहिला डाव सकाळच्या सत्रात २२३ धावांवर आटोपला. त्यामुळे ३६० धावांच्या आघाडीसह ऑसी कर्णधार स्टीव्ह स्मिथने विंडीजवर फॉलोऑन लादला. मग त्यांचा दुसरा डावसुद्धा फक्त १४८ धावांत गडगडला.
दुसऱ्या डावात फक्त सलामीवीर क्रेग ब्रेथवेटने ९४ धावांची झुंजार खेळी साकारली. पहिल्या डावातील शतकवीर डॅरेन ब्राव्हो दुसऱ्या डावात फक्त ४ धावांवर बाद झाला. वेस्ट इंडिजने आतापर्यंतच्या २१ कसोटी सामन्यांपैकी फक्त चार सामने जिंकले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2015 12:39 am

Web Title: australia defeat west indies
Next Stories
1 सचिनची एकही खेळी गावस्करच्या तोलामोलाची नाही. – इम्रान खान
2 सामान्य चाहते घटले..
3 फेडरर-नदाल समोरासमोर
Just Now!
X