नोव्हेंबर महिन्यात कॅरेबियन बेटांवर होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयने आज भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे, तर गेल्या काही सामन्यांमध्ये धावांचा रतिब घालणारी महाराष्ट्राची स्मृती मंधाना संघाची उप-कर्णधार असणार आहे. ९ ते २४ नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे, भारतीय महिलांचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

भारतीय संघाचा या स्पर्धेत ब गटात समावेश करण्यात आलेला असून या गटात भारतीय महिलांना ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड या संघांचा सामना करायचा आहे.

असा असेल महिला विश्वचषकासाठी भारताचा संघ –

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप-कर्णधार), मिताली राज, जेमिया रॉड्रीग्ज, वेदा कृष्णमुर्ती, दिप्ती शर्मा, तानिया भाटीया (यष्टीरक्षक), पुनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिश्त, हेमलता, मानसी जोशी, पुजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी