भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) निवडणूक २२ ऑक्टोबरला होणार असल्याची घोषणा प्रशासकीय समितीने मंगळवारी केली. लोढा समितीच्या शिफारशींची देशातील क्रिकेट प्रशासनात अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०१७मध्ये प्रशासकीय समितीची नियुक्ती केली. याच समितीने न्यायालयाने नेमलेले लवाद अधिकारी पी. एस. नरसिंहा यांच्याशी सखोल चर्चा करून निवडणुकीची तारीख जाहीर केली. विविध राज्य संघटनांनी ८० दावे केले असून, यासंदर्भात मध्यस्थीची भूमिका बजावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्चमध्ये नरसिंहा यांची नियुक्ती केली आहे.