News Flash

BCCIचे मॅच रेफरी प्रशांत मोहापात्रा यांचे करोनामुळे निधन

प्रशांत यांच्या वडिलांनीही गमावला करोनामुळे जीव

प्रशांत मोहापात्रा

ओडिशा क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे मॅच रेफरी प्रशांत मोहापात्रा यांचे करोनामुळे निधन झाले. एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ४७ वर्षांचे होते. ओडिशा क्रिकेट असोसिएशनने बुधवारी ट्विटरवर त्यांच्या मृत्यूची माहिती दिली.

“प्रशांत मोहापात्रा (माजी रणजी करंडक क्रिकेट खेळाडू आणि बीसीसीआय सामनाधिकारी) यांनी बुधवारी सकाळी भुवनेश्वर येथे अखेरचा श्वास घेतला”, असे ट्वीट करत ओडिशा क्रिकेटने त्यांच्या दुःखद आणि अकाली निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

 

प्रशांत मोहापात्रा यांनी ४५ प्रथम श्रेणी सामन्यांत ३०.८४च्या सरासरीने २१९६ धावा केल्या. यात ५ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. ४० घरगुती सामन्यांमध्येही ते रेफरी होते. भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि हरभजन सिंगनेही प्रशांत मोहापात्रा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

 

प्रशांत यांचे वडील रघुनाथ महापात्रा यांचेही कोविडमुळे ९ मे रोजी निधन झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 6:57 pm

Web Title: bcci match referee prashant mohapatra dies of corona adn 96
Next Stories
1 “रोहितचं चरित्रच वेगळं, तो एक cool माणूस”
2 टी-२० वर्ल्डकपचं भवितव्य काय? BCCI ‘या’ तारखेला घेणार बैठक
3 “ही तुमच्या काकाची टीम नाही…”, शोएब अख्तरचा घणाघात
Just Now!
X