News Flash

आयपीएल सामन्यांमध्ये DRS ला बीसीसीआयची मान्यता

नवीन हंगामातील सामन्यांमध्ये होणार वापर

आयपीएल सामन्यांमध्ये DRS ला बीसीसीआयची मान्यता

आयपीएलचा अकरावा हंगाम अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलेला असताना बीसीसीआयने, नवीन हंगामासाठी DRS SYSTEM ला आपला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेनंतर इंडियन प्रिमीअर लिग ही DRS (Decicion Review System) चा वापर करणारी दुसरी स्पर्धा ठरली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे.

अवश्य वाचा – किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व रविचंद्रन अश्विनकडे

DRS चा वापर करण्यासाठी बीसीसीआय उत्सुक होतंच. बीसीसीआय तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून सर्वोत्तम कामगिरी करतंय, मग आयपीएलमध्ये DRS चा वापर का करु नये असं मत सर्व अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. बीसीसीआय प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यात DRS या यंत्रणेचा वापर करतं, म्हणून यंदाच्या आयपीएल सामन्यांमध्येही DRS च्या वापराला बीसीसीआयने परवानगी दिल्याचं एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितलं.

DRS SYSTEM म्हणजे काय ?

DRS म्हणजेत Decision Review System ही यंत्रणा सर्वात प्रथम २०११ साली वापरण्यात आली. खेळपट्टीवरील पंचांनी दिलेला निर्णय जर खेळाडूला मान्य नसल्यास DRS च्या माध्यमातून खेळाडूला तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. खेळपट्टीवरील पंचांनी एखाद्या फलंदाजाला बाद असल्याचा निर्णय दिला असेल आणि तिसऱ्या पंचांच्या पाहणीत जर फलंदाज नाबाद आढळत असेल तर फलंदाजाला जीवदान मिळत. याचसोबत गोलंदाजीवर पंचानी आपलं अपील फेटाळल्यास गोलंदाजांनाही DRS यंत्रणेमार्फत तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

प्रत्येक संघाला कसोटी सामन्यात २ तर वन-डे सामन्यात एका डावात DRS ची १ यशस्वी संधी मिळते. जर संघाने मागितलेली दाद यशस्वी ठरली तरी ही संधी कायम राहते. मात्र तिसऱ्या पंचांच्या पाहणीतही खेळपट्टीवरील पंचांचा निर्णय योग्य दिसत असल्यास संघाला आपली DRS ची संधी गमवावी लागते. काळानुरुप या यंत्रणेतही आयसीसीने महत्वाचे बदल केले आहेत.

सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये बीसीसीआयचा DRS यंत्रणेला विरोध होता. निकाल देण्याच्या बाबतीत DRS ही यंत्रणा अजुनही पूर्णपणे विकसीत नसल्याने बीसीसीआयने DRS ला आपला विरोध दर्शवला होता. मात्र इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्यात बीसीसीआयने एक पाऊल मागे येत DRS यंत्रणा वापरण्याची तयारी दाखवली यानंतर प्रत्येक सामन्यात DRS चा वापर केला जातो आहे. आयपीएलच्या सामन्यांत DRS चा वापर करण्यासाठी आयसीसीच्या पंचांचं एक खास पथक आंध्र प्रदेशला येणार आहे. यात पंचांना DRS यंत्रणेतले बारकावे व अन्य तांत्रिक बाबी शिकवल्या जातील. त्यामुळे यंदाच्या आयपीएल हंगामात DRS च्या वापरामुळे सामने कसे रंगतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 11:53 am

Web Title: bcci send green signal for drs use in ipl 2018
टॅग : Bcci,IPL 2018
Next Stories
1 IPL 2018 – अकराव्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सचा सराव सुरु
2 IPL 2018 – कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदासाठी ख्रिस लिन उत्सुक
3 IPL 2018 : आयपीएल ११ चे वेळापत्रक जाहीर, मुंबई आणि चेन्नई संघांमध्ये पहिली लढत
Just Now!
X