भारताचा माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदने आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेतील सहाव्या फेरीअखेर चार गुणांसह आघाडी कायम राखली. त्याला सर्जी कर्जाकिनविरुद्धच्या डावात बरोबरी स्वीकारावी लागली. कर्जाकिनविरुद्ध आनंदला पांढऱ्या मोहऱ्यांचा फायदा घेता आला नाही. कर्जाकिनने कल्पक चाली करीत आनंदला चोख उत्तर दिले. अन्य लढतीत, व्हॅसेलिन टोपालोव्हने व्लादिमीर क्रामनिकवर सनसनाटी विजय मिळविला. त्याने सुरेख डावपेच करीत ४१ व्या चालीस क्रामनिक याला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. पीटर स्विडलरने शाख्रीयर मामेद्योरोव्हला पराभूत केले तर लिवॉन आरोनियनला दिमित्री आंद्रेकिनविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली.