19 September 2020

News Flash

धोनीचं करिअर संपलेलं नाही – निवड समिती प्रमुख एम. एस. के. प्रसाद

सोशल मीडियावर चाहत्यांची नाराजी

विंडीजविरुद्ध तिसऱ्या सामन्यात झेल घेताना महेंद्रसिंह धोनी

बीसीसीआयने भारताच्या आगामी विंडीज व ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. निवड समितीने विंडीज व ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेतून महेंद्रसिंह धोनीला विश्रांती दिली आहे. यानंतर क्रिकेट प्रेमींनी सोशल मीडियावर संघनिवडीबद्दल नाराजी व्यक्त केली. अनेकांनी हा धोनीपर्वाचा अस्त आहे का? असा सवालही विचारला. मात्र यानंतर निवडसमितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी स्पष्टीकरण देत धोनीचं करिअर संपलेलं नाही असं स्पष्टीकरण दिलंय.

“आम्हाला दुसऱ्या यष्टीरक्षकाबद्दलचे पर्याय धुंडाळून पहायचे आहेत, यासाठी आगामी दोन दौऱ्यांमध्ये आम्ही धोनीचा संघात समावेश केला नाही. या कारणासाठी ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांना संघात जागा देण्यात आलेली आहे. या दोघांनाही मालिकेत यष्टीरक्षण व फलंदाजीची संधी मिळेल. मात्र याचा अर्थ धोनीचं करिअर संपलं असा होत नाही.” पत्रकार परिषदेत प्रसाद यांनी धोनीच्या निवडीबद्दल आपली बाजू स्पष्ट केली.

प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरीही धोनीच्या चाहत्यांनी कालपासून सोशल मीडियावर आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 3:18 pm

Web Title: chief selector msk%e2%80%89prasad gives reason behind ms dhonis ouster twitter lashes out
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : जयपूर पिंक पँथर्सच्या घरच्या मैदानावरचे सामने पंचकुलात हलवले
2 IND vs WI : वय वर्ष ३७, FIT and FINE! धोनीचा हा झेल एकदा पाहाच
3 IND vs WI : विंडीजची भारतावर मात, मालिकेतील ‘होप’ जिवंत
Just Now!
X