11 August 2020

News Flash

चीन, हॉलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा रद्द

लिंगशुइ चीन मास्टर्स ही स्पर्धा याआधी २५ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणार होती

संग्रहित छायाचित्र

जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) मंगळवारी चीन मास्टर्स आणि हॉलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २०२० मोसमाच्या वेळापत्रकातील आणखीन दोन महत्त्वाच्या स्पर्धा ‘बीडब्ल्यूएफ’ने रद्द केल्या आहेत.

लिंगशुइ चीन मास्टर्स ही स्पर्धा याआधी २५ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणार होती. मात्र ती दोन वेळा लांबणीवर पडली. डच म्हणजेच हॉलंड खुली स्पर्धा ६ ते ११ ऑक्टोबर दरम्यान होणार होती. ‘‘करोनामुळे खेळाडूंच्या जीवाला उद्भवणारा वाढता धोका लक्षात घेता महासंघाने या स्पर्धा रद्द केल्या आहेत,’’ असे ‘बीडब्ल्यूएफ’ने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 12:11 am

Web Title: china holland open badminton tournament canceled abn 97
Next Stories
1 आजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्रारंभ
2 धोनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हार्दिक पांड्या थेट रांचीला, व्हिडीओ व्हायरल
3 T-20 WC : मेलबर्नमध्ये पुन्हा लॉकडाऊन, आता तरी निर्णय घ्या ! बीसीसीआयचा आयसीसीला टोला
Just Now!
X