01 December 2020

News Flash

Video: सॉरी वॉर्नर… डेव्हिड वॉर्नरच्या लेकीला आवडतो ‘हा’ क्रिकेटपटू

पत्नीच्या मुलाखतीची जोरदार चर्चा

IPL चा हंगाम संपल्यानंतर आता साऱ्यांना भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेचे वेध लागले आहेत. टीम इंडिया काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियात दाखल झाली असून सध्या खेळाडू क्वारंटाइन कालावधी संपवून जोरदार सरावाला लागले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मालिका हा कायमच चर्चेचा विषय असतो. दोन तुल्यबळ संघांची लढाई पाहण्यासाठी सारेच आतुर असतात. या मालिकेआधी सध्या कोणत्या खेळाडूचा किती प्रभाव पडेल? कोण खेळाडू अधिक फेव्हरेट असेल? अशा चर्चांना उधाण आले आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्या लेकीला एक भारतीय खेळाडू अधिक आवडत असल्याचं समजलं आहे.

वॉर्नरची पत्नी कँडीस एका रोडिओ मुलाखतीसाठी गेली होती. तिथे मुलाखतीत तिला विविध प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तिला भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेसंदर्भातही प्रश्न विचारण्यात आले. तुम्ही सारे घरी क्रिकेट खेळता का? आणि तुझ्या मुलींना कोणता क्रिकेटपटू आवडतो? असा प्रश्न कँडिसला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली की आम्ही घराच्या मागच्या अंगणात थोडंफार क्रिकेट खेळतो. माझ्या मुली काहीवेळा आवडता क्रिकेटपटू म्हणून बाबांचं (वॉर्नर) घेतात, तर कधी ऑरोन फिंचचं नाव घेतात. पण माझी मधली मुलगी कायम विराटचंच नाव घेते. तिला विराटसारखं बनायचंय आणि तोच तिचा आवडता खेळाडू आहे असं ती नेहमी सांगते.

पाहा भन्नाट व्हिडीओ-

असा आहे टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा-

पहिला वन-डे सामना – २७ नोव्हेंबर – सिडनी
दुसरा वन-डे सामना – २९ नोव्हेंबर – सिडनी
तिसरा वन-डे सामना – १ डिसेंबर – मनुका ओव्हल
————————————————————–
पहिला टी-२० सामना – ४ डिसेंबर – मनुका ओव्हल
दुसरा टी-२० सामना – ६ डिसेंबर – सिडनी
तिसरा टी-२० सामना – ८ डिसेंबर – सिडनी
—————————————————————
पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अ‍ॅडलेड (दिवस-रात्र)
दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी २०२१ – सिडनी
चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गॅबा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 5:56 pm

Web Title: comedy video of wife of david warner candice reveals their daughters favourite cricketer is virat kohli vjb 91
Next Stories
1 BCCI कडून करारपद्धतीत बदल, टी-२० खेळाडूंनाही मिळणार संधी
2 Video : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या नाकीनऊ आणणाऱ्या पुजाराचा कसून सराव
3 ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहितने कंबर कसली, NCA मध्ये सरावाला सुरुवात
Just Now!
X