राष्ट्रकुल स्पर्धेतला सहावा दिवस भारतासाठी काहीसा संमिश्र ठरला आहे. २५ मी. पिस्तुल प्रकारात भारताच्या हिना सिद्धुने मिळवलेल्या पदकाव्यतिरीक्त एकही पदक मिळवता आलेलं नाहीये. सकाळच्या सत्रात भारताच्या गगन नारंग आणि चैन सिंह या दोन खेळाडूंनी रायफल प्रोन प्रकारात निराशा केली. यानंतर हिना सिद्धुने भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक टाकत पदकांची संख्या २० वर नेली. अंतिम फेरीत अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत हिनाने आपल्या ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्ध्यावर अवघ्या काही गुणांच्या फरकाने मात करत सुवर्णपदक मिळवलं. मात्र बाकीच्या खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही.
दुसरीकडे भारतीय बॉक्सर्सनी मात्र धडाकेबाज कामगिरी करत, देशासाठी ६ पदकं निश्चीत केली आहेत. अमित फांगल, नमन तवंर, मोहम्मद हसीमुद्दीन, मनोज कुमार आणि सतीश कुमार या बॉक्सर्सनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. याव्यतिरीक्त महिला बॉक्सिंगमध्येही मेरी कोमचं एक पदक निश्चीत झालेलं आहे. त्यामुळे आगामी फेऱ्यांमध्ये भारतीय बॉक्सर आपल्या कांस्यपदकाचं सुवर्ण किंवा रौप्य पदकात रुपांतर करतात का हे पहावं लागणार आहे.
याचसोबत भारतीय पुरुष आणि महिला संघानेही उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय पुरुषांनी मलेशियावर २-१ तर महिला संघाने दक्षिण आफ्रिकेवर १-० अशी मात केली. याव्यतिरीक्त ४०० मी. शर्यतीत भारताचा मोहम्मद युनूस याहीया अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर आला. याचसोबत महिलांच्या ४०० मी. शर्यतीत भारताची हिमा दासही अंतिम फेरीत दाखल झाली आहे.
- दिवसाच्या अखेरीस भारताच्या खात्यात २० पदकं. ११ सुवर्ण पदक, ४ रौप्य पदक, ५ कांस्य पदक
- ४०० मी. महिलांच्या शर्यतीत भारताची हिमा दास अंतिम फेरीत दाखल
- अंतिम फेरीत मोहम्मद याहिया चौथ्या स्थानावर
- ४०० मी. धावण्याच्या शर्यतीत भारताचा मोहम्मद अनस याहिया पदकाच्या शर्यतीमधून बाहेर
- भारताचा बॉक्सर सतीश कुमार उपांत्य फेरीत दाखल, बॉक्सिंगमध्ये भारताला सहावं पदक निश्चीत
- भारतीय महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत दाखल, दक्षिण आफ्रिकेवर १-० ने केली मात
- ६९ किलो वजनी गटात भारताचा मनोज कुमार पुढच्या फेरीत, भारताचं आणखी एक पदक निश्चीत
- बॉक्सिंगमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चीत, ५६ किलो वजनी गटात भारताचा मोहम्मद हसीमुद्दीन उपांत्य फेरीत
- भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक
- शेवटच्या संधीत अटीतटीच्या लढाईत हिना सिद्धुची बाजी, ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्ध्यावर केली मात
- हिना सिद्धुवर भारताची मदार
- २५ मी. पिस्तुल प्रकारात भारताची अनु सिंह पदकाच्या शर्यतीततून माघारी
- बॉक्सिंग- ९१ किलो वजनी गटात भारताचं आणखी एक पदक निश्चीत, भारताचा नमन तवंर उपांत्य फेरीत
- बॅडमिंटन मिश्र दुहेरी प्रकारातही भारताची आश्विनी पोनाप्पा-सात्विक रणकीरेड्डी जोडी पुढच्या फेरीत
- स्क्वॅश – मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या दिपीका पल्लीकल आणि सौरव घोषाल पुढच्या फेरीत दाखल९१
- अमितच्या खेळीमुळे भारताला किमान एक कांस्यपदक निश्चीत
- बॉक्सिंग: ४६-४९ वजनी गटात भारताच्या अमित फांगल उपांत्यपूर्व सामन्यात विजयी
- ५० मी. रायफल प्रोन प्रकारात भारताची पदकाची आशा संपली
- चैन सिंहचीही निराशा, अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर मानावं लागलं समाधान
- भारताच्या चैन सिंहची पदकासाठी झुंद अद्यापही सुरुच
- ५० मी. रायफल प्रोन प्रकारात भारताचा गगन नारंग पदकाच्या शर्यतीमधून माघारी
- ५० मी. रायफल प्रोन प्रकारात गगन नारंग व चैन सिंह अंतिम फेरीत
- २५ मी. एअर पिस्तुल प्रकारात हिना सिद्धु आणि अनु सिंह अंतिम फेरीत
- नेमबाजपटूंचीही धडाकेबाज कामगिरी सुरुच, भारताचे ४ नेमबाज अंतिम फेरीत पोहचले
- उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाची जागा पक्की
- सकाळच्या सत्रात हॉकीमधून भारतासाठी आनंदाची बातमी, पुरुष संघाची मलेशियावर २-१ ने मात