टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर सध्या भारतीय चाहत्यांच्या रोषाचं कारण ठरत आहेत. विश्वचषकादरम्यान भारतीय खेळाडूंवर सतत टीका करणं यामुळे सोशल मीडियावर चाहते संजय मांजरेकर यांना ट्रोल करत आहेत. त्यातच रविंद्र जाडेजा संजय मांजरेकरांवर चांगलाच भडकला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलत असताना मांजरेकर यांनी जाडेजावर टीका केली होती. ही टीका सहन न झाल्याने जाडेजाने तितक्याच तीव्र शब्दांत मांजरेकरांना टोला लगावला आहे.

“सध्या वन-डे क्रिकेटमध्ये रविंद्र जाडेजा जी भूमिका बजावतो आहे, अशा खेळाडूंचा मी फारसा चाहता नाहीये. कसोटी क्रिकेटमध्ये जाडेजा एक उत्तम गोलंदाज आहे. मात्र वन-डे क्रिकेटमध्ये मी त्याच्याऐवजी एक फलंदाज आणि एक फिरकीपटू संघात घेईन.” मांजरेकर IANS वृत्तसंस्थेशी बोलत होते.

ravi rana bachchu kadu
“आम्ही तुमच्या खासगी गोष्टी बाहेर काढल्या तर…”, बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा
jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
bjp keshav upadhyay article targeting sharad pawar uddhav thackeray and praskash ambedkar
संगीत खंजीर कल्लोळ…

या टिकेला रविंद्र जाडेजाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जशास तसं उत्तर दिलं आहे.

जेवढे सामने तू खेळला आहेस, त्याच्या दुप्पट सामने मी खेळलो आहे आणि अजुनही खेळतोय. अशा आशयाचा संदेश देत जाडेजाने मांजरेकरांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं आहे. मध्यंतरी मांजरेकर यांनी महेंद्रसिंह धोनी याच्या खेळावरही टीका केली होती.