09 July 2020

News Flash

‘निराश होऊ नकोस’; सचिनचा विल्यमसनला खास संदेश

विश्वचषकात विल्यमसनला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले

टीम इंडियाला विश्वचषक स्पर्धेत घरचा रस्ता दाखवणारा न्यूझीलंड संघ अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडकडून पराभूत झाला. न्यूझीलंडने २४१ धावा करून इंग्लंडला २४२ धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक बाऊंड्री (चौकार-षटकार) मारण्याच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आला. या सामन्यात बेन स्टोक्सला सामनावीर तर कर्णधार केन विल्यमसनला मालिकावीर घोषित करण्यात आले.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याच्या हस्ते विल्यमसनला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विश्वचषकातील अंतिम सामन्याचा निकाल लागल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यात विल्यम्सनला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देताना सचिन तेंडुलकरने त्याला काहीतरी सांगितल्याचे सर्वानी पाहिले. मात्र सचिन नक्की काय म्हणाला हे अद्यापही गुलदस्त्यात होते.

खुद्द सचिननेच या विषयी उलगडा केला. ‘‘विल्यम्सन तुझा खेळ संपूर्ण विश्वाने पाहिला असून तुझा बर्फासारखा शांत स्वभाव व संयमाचे सर्वच चाहते झाले आहेत. त्यामुळे निराश होऊ नकोस,’’ अशा शब्दांत सचिनने विल्यम्सनची पाठ थोपटली. २००३च्या विश्वचषकात सचिननेही तब्बल ६७३ धावा करून जवळपास एकहाती भारताला अंतिम फेरीपर्यंत नेले होते. परंतु भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळेच सचिनच विल्यमसनचे दु:ख चांगल्या प्रकारे समजू शकतो, अशा चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगत आहेत.

दरम्यान, बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडला विजयासमीप नेले होते. स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. पण सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला, त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंड नवा विश्वविजेता ठरवण्यात आला. त्यामुळे ICC च्या नियमांवर टीका होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2019 10:51 am

Web Title: cricket world cup 2019 sachin tendulkar kane williamson special message vjb 91
Next Stories
1 WC Final : ‘माफ करा, आम्हाला जिंकता आलं नाही’; ट्रेंट बोल्टला भावना अनावर
2 स्टोक्सने पंचांना ‘ओव्हर-थ्रो’च्या धावा न देण्याचे सुचवले होते!
3 Viral Video : आजीबाई जोरात… इंग्लंडच्या विजयानंतर केलं धमाकेदार सेलिब्रेशन!
Just Now!
X