27 September 2020

News Flash

डेल स्टेनने मागितली विराटची माफी

डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा सप्टेंबर महिन्यात होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ३ टी २० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे कर्णधारपद यष्टीरक्षक क्विंटन डी कॉककडे सोपवण्यात आले आहे. या संघातून फाफ डू प्लेसिसला वगळण्यात आले आहे. पण कसोटी संघाच्या कर्णधारपदी मात्र डू प्लेसिस कायम ठेवण्यात आले आहे. याच दौऱ्यातील टी २० मालिकेसाठी डेल स्टेनला देखील वगळण्यात आले आहे. त्यावरून एका फॅनने स्टेनला प्रश्न विचारताच त्याने चक्क विराट कोहलीची माफी मागितली आहे.

डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण डेल स्टेनला आफ्रिकेच्या टी २० संघातही स्थान मिळालेले नाही. त्यामुळे एका क्रिकेट चाहत्याने डेल स्टेनला एक प्रश्न विचारला. “निवड समिती कदाचित तुला मोठ्या आणि अधिक महत्वाच्या सामन्यांसाठी जपून ठेवत आहे.”, असे चाहत्याने स्टेनले उद्देशून म्हटले. तसेच चाहत्याने सध्या निवड समितीत कोण आहे?, असा प्रश्न विचारला.

चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना स्टेनने थेट टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचीच माफी मागितली. स्टेनला मोठ्या सामन्यांसाठी राखून ठेवण्यात आले आहे म्हणजेच भारत हा संघ निवडकर्त्यांना तितकासा मोठा संघ वाटत नाही, असे म्हणत स्टेनने विराटची माफी मागितली.

दरम्यान, १५ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा सुरू होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2019 7:05 pm

Web Title: dale steyn apologises to virat kohli t20 series india tour selectors vjb 91
Next Stories
1 ‘ताबडतोब परत ये!’ टीम इंडियाच्या सदस्याला BCCI चा आदेश
2 ‘कॅप्टन सुपरकूल’ विल्यमसनवर ४ वर्षानंतर ओढवली ‘ही’ नामुष्की
3 हिटमॅनच्या फटकेबाजीमुळे वाढतंय युवराजचं ‘टेन्शन’
Just Now!
X