News Flash

Denmark Open 2018 : अश्विनी पोनप्पा-सिक्की रेड्डी जोडी उपांत्यपूर्व फेरीत

पुढील सामना अव्वल मानांकित फुकुशिमा आणि हीरोता या जोडीशी

Denmark Open 2018 स्पर्धेत गुरुवारी महिला दुहेरीच्या गटात भारताच्या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अश्विनी पोनप्पा – सिक्की रेड्डी या अनुभवी जोडीने ७व्या मानांकित कोरियाच्या ली एस-एच आणि शीन एस-सी या जोडीला १८-२१, २२-२०,२१-१८ असे पराभूत केले.

कोरियन जोडीने पहिला गेम १८-२१ अशा फरकाने जिंकला. त्यांचा खेळ अत्यंत आक्रमक होता. पण भारतीय जोडीने हार मानली नाही. दुसऱ्या गेममध्ये जोरदार कमबॅक करत भर्तरीय जोडीने तो गेम २२-२० असा जिंकला आणि सामना बरोबरीत आणला. त्यानंतर पुढील गेम अटीतटीचा होणार हे अपेक्षितच होते. त्यानुसार सामना चांगलाच रंगला. अखेर शेवटी भारतीय जोडीने तिसरा गेम २१-१८ असा जिंकत सामना खिशात घातला.

आता त्यांचा सामना अव्वल मानांकित फुकुशिमा आणि हीरोता या जोडीशी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 11:40 am

Web Title: denmark open 2018 ashwini ponnappa and sikki reddy through to quarter finals
Next Stories
1 Asian Champions Trophy : भारतीय हॉकी संघाची विजयादशमी, ओमनचा पराभव
2 उसैन बोल्टने माल्टा क्लबचा प्रस्ताव नाकारला
3 पवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत
Just Now!
X