अव्वल दर्जाची खेळाडू दीपिका पल्लिकल हिच्या अनुपस्थितीत उतरलेल्या भारताला महिलांच्या विश्व स्क्वॉश स्पर्धेत हाँगकाँग संघाकडून ०-३ असा पराभव स्वीकारावा लागला.  भारताच्या अनाका अलंकामोनी हिला पहिल्या लढतीत जोये चान हिने ४-११, ११-१, ११-४, ११-९ असे हरविले. पाठोपाठ भारताची अनुभवी खेळाडू जोश्ना चिनप्पा हिला अ‍ॅनी एयु हिने ११-३, ११-८, ११-८ असे २४ मिनिटांत पराभूत केले. हाँगकाँगच्या लिऊ त्झेलिंग हिने हर्षित कौर हिच्यावर ११-२, १२-१०, ११-५ अशी मात करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. या स्पर्धेतील उपांत्य फेरीत त्यांनी हाँगकाँगवर मात केली होती.