भारताचा धडाकेबाज सलामीवीर आणि तडफदार फलंदाज सुरेश रैना दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी फॉर्म आणि फिटनेस पाहण्यासाठी भारतीय ‘अ’ संघातून खेळणार आहे. मायदेशात भारत ‘अ’ आणि बांगलादेश ‘अ’ या संघांमध्ये तीन दिवसीय सामना आणि तीन एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत.

श्रीलंकेच्या दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यामध्ये धवनच्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला अन्य दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले होते. पण भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व त्याच्याकडे सोपवण्यात आले आहे. रैनाने विवाहबद्ध झाल्यानंतर नेदरलँड्सच्या संघाबरोबर सराव केला होता. जून महिन्यानंतर रैनाने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे सरावासाठी त्याने बांगलादेश ‘अ’विरुद्धच्या सामन्यामध्ये खेळण्याचे ठरवले आहे. एकदिवसीय संघाचे नेतृत्व या वेळी उन्मुक्त चंदला देण्यात आले आहे.
एकदिवसीय संघ : उन्मुक्त चंद (कर्णधार), मयांक अगरवाल, मनीष पांडे, सुरेश रैना, केदार जाधव, संजू सॅमसन, करुण नायर, कुलदीप यादव, जयंत यादव, कर्ण शर्मा, रिषी धवन, एस. अरविंद, धवल कुलकर्णी, रुष कलारिया, गुरक्रीत सिंग मान.
तीन दिवसीय सामन्यांसाठी संघ : शिखर धवन (कर्णधार), अभिनव मुकुंद, करुण नायर, श्रेयर अय्यर, बाबा अपराजित, नमन ओझा, जयंत यादव, विजय शंकर, रवींद्र जडेजा, श्रेयस गोपाल, अभिमन्यू मिथुन, वरुण आरोन, ईश्वर पांडे आणि शेल्डॉन जॅक्सन.