आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेले काही दिवस महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयीची चर्चा सुरु आहे. विश्वचषकानंतर धोनीने क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. निवड समितीनेही आगामी मालिकांमध्ये ऋषभ पंत पहिली पसंती असेल असं म्हणत धोनीला सूचक इशारा दिला. मात्र धोनीसारख्या खेळाडूला त्याच्या लौकिकाला साजेसा निवृत्तीचा सामना मिळायलाच हवा असं मत प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी व्यक्त केलं आहे. ते काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी बोलत असताना हर्षा भोगले यांनी गेल्या काही दिवसांमध्ये धोनीच्या फलंदाजीतल्या खालावलेल्या फॉर्मबद्दलही भाष्य केलं. “काही वर्षांपूर्वी धोनी जसा खेळ करत होता तो धोनी आज आपल्याला मिळणं अशक्य आहे. खेळामध्ये तुम्हाला काही वर्षांनंतर शाररिक बंधन येतात. तुमचं शरीर पहिल्यासारखं काम करत नाही. प्रत्येकाला आक्रमक खेळ करण्याची इच्छा असते मात्र शरीर साथ देत नाही.” धोनीच्याही बाबतीत हेच घडत असल्याचं भोगले म्हणाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhoni deserves send off game considering his contribution to game says harsha bhogle psd
First published on: 06-11-2019 at 12:09 IST