भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने अखेरीस आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. धोनीच्या निवृत्तीची बातमी समजताच त्याच्या संघातील सहकाऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. धोनीचा संघातील साथीदार आणि यष्टीरक्षक दिनेश कार्तिकनेही धोनीसोबत २०१९ विश्वचषकादरम्यानचा आपला फोटो पोस्ट करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धोनीसोबत आतापर्यंत अनेक चांगल्या आठवणी माझ्या नेहमी लक्षात राहतील. मला आशा आहे की बीसीसीआय त्याची 7 नंबरची जर्सी कायमस्वरुपी रिटायर करेल.

भारतीय खेळाडू आणि जर्सी यांचं एक अनोखं नातं असतं. २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सचिन तेंडुलकर आणि 10 नंबरची जर्सी हे समीकरण प्रसिद्ध झालं होतं. अनेक नवोदीत क्रिकेटपटूही मैदानावर 10 नंबरची जर्सी घालून खेळताना दिसायचे. सचिनच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने 10 नंबरची जर्सी कायमस्वरुपी रिटायर केली होती. त्यात पद्धतीने धोनीची जर्सीही रिटायर करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

अवश्य वाचा – धोनीसाठी अखेरचा सामना आयोजित करा, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची बीसीसीआयला विनंती

२०१९ विश्वचषकात धोनी आणि दिनेश कार्तिक हे न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात सहभागी झाले होते. परंतू या सामन्यात भारतीय संघाला दुर्दैवाने १८ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला असता दिनेश कार्तिकने धोनीआधी भारतीय संघात पदार्पण केलं होतं. परंतू मिळालेल्या संधीचं सोनं न करता आल्यामुळे कार्तिक संघात आपलं स्थान निर्माण करु शकला नाही. पण दुसरीकडे धोनीने आपल्या मेहनतीने संघात स्थान निर्माण करत संघाचं कर्णधारपद आणि यष्टीरक्षक असं स्थान पक्क केलं. दिनेश कार्तिकही सध्या भारतीय संघाबाहेर असला तरीही त्याने अद्याप निवृत्ती जाहीर केलेली नाही.

अवश्य वाचा – कारकिर्दीची सुरुवात आणि अखेर धावबाद होऊनच…जाणून घ्या धोनीबद्दलचा हा योगायोग