पाकिस्तानचा नवनिर्वाचीत कर्णधार बाबर आझम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडमध्ये पाकिस्तानी संघ ३ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बाबरने आपल्या फलंदाजीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचं स्थान कमावलं आहे. अनेकदा त्याची तुलना ही विराट कोहलीसोबतही केली जाते. परंतू बाबर आझमच्या मनात काहीतरी वेगळंच आहे.

जगातील सर्वोत्तम फलंदाजांसोबत आपल्या होत असलेल्या तुलनेबद्दल विचारलं असता बाबर म्हणाला, “सर्वोत्तम फलंदाजांसोबत माझी कल्पना होत असल्याचं पाहून मला खरंच खूप अभिमान वाटतो. पण माझं स्वप्न आहे की एक दिवस मी अशा ठिकाणी पोहचेन की ज्यावेळी लोकं इतर फलंदाजांची माझ्याशी तुलना करतील. मला याची कल्पना आहे की मला देखील त्यांच्याप्रमाणे प्रत्येक प्रकारात प्रत्येक परिस्थितीत तसा सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे.” बाबर यु-ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

अवश्य वाचा – COVID-19 चे नियम मोडले, पाकिस्तानी खेळाडूची स्पर्धेतून हकालपट्टी

पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडमध्ये ३ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. १८ डिसेंबरपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेला सुरुवात होणार असून, २६ डिसेंबरपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल.

अवश्य वाचा – आता नियम मोडाल तर थेट घरी पाठवू, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा पाकिस्तानी खेळाडूंना इशारा