News Flash

द्युतीचा ऑलिम्पिकसाठी आलिशान गाडी विकण्याचा निर्णय

टोक्यो ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी पैसेच शिल्लक राहिले नसल्याने गाडी विकण्याचा निर्णय

संग्रहित छायाचित्र

 

करोनाचा फटका क्रीडा क्षेत्रासह खेळाडूंनाही मोठय़ा प्रमाणात बसला आहे. जास्त करून या काळात आव्हान निर्माण झाले आहे ते टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ पाहणाऱ्या खेळाडूंसाठी. भारताची अव्वल महिला धावपटू द्युती चंदने तिची आलिशान ‘बीएमडब्ल्यू’ गाडी विकण्याचा निर्णय घेतला आहे. टोक्यो ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी पैसेच शिल्लक राहिले नसल्याने गाडी विकण्याचा निर्णय नाइलाजास्तव घ्यावा लागत असल्याचे २४ वर्षीय द्युतीने म्हटले आहे.

‘‘करोनाच्या काळात आतापर्यंत साठवलेले सर्व पैसे खर्च झाले. मात्र आता ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी पैशांची गरज आहे. या कारणास्तव माझ्याकडील आलिशान बीएमडब्ल्यू ही ३० लाखांची गाडी विकण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे द्युती म्हणाली. ‘‘देशासाठी भविष्यात आणखी पदके जिंकून जेव्हा मी चांगली कमाई करेन त्यानंतर पुन्हा आलिशान गाडी विकत घेईन. मात्र सध्या मला ऑलिम्पिकच्या तयारीसाठी पैशांची नितांत गरज आहे,’’ असेही द्युतीने सांगितले.

घरात एकटीच कमावणारी असल्याने जबाबदारी असल्याचेही ओदिशाच्या द्युतीने म्हटले. ‘‘माझे घर माझ्या कमाईवर अवलंबून आहे. त्या जोडीला सराव करण्यासाठीदेखील आहारापासून अनेक गोष्टींचा खर्च असतो,’’ असे द्युतीने सांगितले. द्युतीने तिच्या गाडीसोबतचे छायाचित्र समाजमाध्यमावर टाकले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 12:14 am

Web Title: dyutis decision to sell a luxury car for the olympics abn 97
Next Stories
1 ब्रॉडला वगळण्याचा निर्णय योग्यच -स्टोक्स
2 प्रेक्षकांशिवाय कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा पर्याय
3 ऑलिम्पिक पुढील वर्षीच खेळवावे -युरीको
Just Now!
X