श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान इंग्लंडचा स्टार गोलंदाज सॅम करन आपल्या एका भन्नाट कृतीमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. या सामन्यात त्याने चेंडूला फुटबॉलप्रमाणे किक मारत लंकेच्या फलंदाजाला धावबाद केले. करनचा या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आयपीएलमध्ये करन महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळतो.

कार्डिफमध्ये खेळल्या गेलेल्या दुसर्‍या टी-२० सामन्यात सॅम करनने श्रीलंकेचा सलामीवीर धनुष्का गुणातिलाकाला बाद केले. करनने आपल्या पायांद्वारे चेंडू यष्ट्यांवर आदळला. भन्नाट पद्धतीने धावबाद केल्यानंतर करनचा आनंदत गगनात मावत नव्हता. डकवर्थ लुईसच्या जोरावर इंग्लंडने हा सामना ५ गडी राखून सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ७ गडी गमावत १११ धावा केल्या. मात्र, पावसामुळे इंग्लंडला १०३ धावांचे लक्ष्य मिळाले, हे लक्ष्य इंग्लंडने ५ गडी राखून सहज गाठले.

Crime Branch raid on Betting on IPL Cricket Match in Kothrud
कोथरुडमध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा; गुन्हे शाखेचा छापा, दहा सट्टेबाज अटकेत
Indian Premier League Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad sport news
बंगळूरुच्या गोलंदाजांकडे लक्ष!
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

 

हेही वाचा –  ३ वर्षाच्या चिमुरडीला हवंय १६ कोटींचं इंजेक्शन..! ‘स्टार’ क्रिकेटपटूंनी केलं मदतीचं आवाहन

या सामन्यात करनने ८ धावा देत एक बळी घेतला. त्याने नाबाद १६ धावाही केल्या. इंग्लंडकडून लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक २९ धावा केल्या. तर श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक ३९ धावा केल्या. इंग्लंडने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा पहिला सामना ८ विकेट्सने जिंकला. इंग्लंडने मालिकेत २-०अशी आघाडी घेतली आहे. दोघांमधील तिसरा सामना २६ जून रोजी खेळला जाईल.