News Flash

IND vs ENG : इंग्लंडच्या कसोटी संघाची घोषणा, शिक्षा मिळालेला खेळाडू संघात परतला

'या' स्टार चार खेळाडूंचं संघात पुनरागमन

इंग्लंडचा संघ

इंग्लंड क्रिकेट संघाने भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. दोन्ही संघांत ४ ऑगस्टपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.  इंग्लंडने १७ सदस्यीय संघाची घोषणा केली. या  संघात बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो आणि सॅम करनचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सहभागी नव्हते. या मालिकेनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. दुखापतीमुळे या दोन कसोटी सामन्यांमध्ये जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्सचा समावेश केलेला नाही.

ओली रॉबिन्सनलाही या संघात संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्याने कसोटी सामन्यात पदार्पण केले होते, परंतु जुन्या ट्वीटवरून झालेल्या वादानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याला निलंबित केले होते. त्याच्यावर वर्णद्वेष्ट आणि महिलाविरोधी ट्वीट केल्याचा आरोप होता.

 

हेही वाचा – ICC Rankings : धवनला फायदा आणि बाबरला संधी!

इंग्लंडचा संघ : जो रूट (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, जॅक लीच, ओली पोप, जॅक क्रॉले, जेम्स अँडरसन, डोम बेस, सॅम करन, ओली रॉबिन्सन, हसीब हमीद, डॉम सिब्ले, डॅन लॉरेन्स, बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, रॉय बर्न्स, मार्क वूड.

कसोटी मालिका

  • पहिला सामना – ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंगहॅम
  • दुसरा सामना  – १२ ते १६ ऑगस्ट, लंडन
  • तिसरा सामना – २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
  • चौथा सामना – २ ते ६ सप्टेंबर, लंडन
  • पाचवा सामना – १० ते १४ सप्टेंबर, मँचेस्टर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 6:54 pm

Web Title: england name 17 member squad for first two tests vs india adn 96
Next Stories
1 ICC Rankings : धवनला फायदा आणि बाबरला संधी!
2 VIDEO : भारताकडून हरल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार व प्रशिक्षक यांच्यात बाचाबाची
3 सुरेश रैनानं स्वत: ला म्हटलं ‘ब्राह्मण’; भडकलेले नेटकरी म्हणाले, “तुला लाज…”
Just Now!
X