News Flash

असं असेल इंग्लंडच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक

पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात

ऑस्ट्रेलियाचा २-१नं पराभव करत कसोटी मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी पुढचं आव्हान तयार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीनं १८ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. हार्दिक पांड्या आणि इशांत शर्मा यांचं कसोटी सामन्यात पुनरागमन झालं आहे. तर अक्षर पटेल याला पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.

आरोग्यविषयक सर्व नियमांची पूर्तता करुन दोन्ही संघांना सुरक्षित वाटेल असं वातावरण तयार करण्यात येईल अशी माहिती शहा यांनी दिली. यासाठी Bio Secure Bubble तयार करण्यात येणार आहे. दरम्यान इंग्लंडचा संघ या मालिकेत ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहेत. यातील दोन सामने चेन्नईत, उर्वरित दोन सामने आणि टी-२० मालिका अहमदाबाद तर वन-डे मालिका पुण्यात रंगणार आहे.

असं असेल इंग्लंडच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक –

 • ५ ते ९ फेब्रुवारी – पहिला कसोटी सामना – चेन्नई
 • १३ ते १७ फेब्रुवारी – दुसरा कसोटी सामना – चेन्नई
 • २४ ते २८ फेब्रुवारी – तिसरा कसोटी सामना – अहमदाबाद (दिवस-रात्र)
 • ४ ते ८ मार्च – चौथा कसोटी सामना – अहमदाबाद
  —————————————————————————–
 • १२ मार्च – पहिला टी-२० सामना
 • १४ मार्च – दुसरा टी-२० सामना
 • १६ मार्च – तिसरा टी-२० सामना
 • १८ मार्च – चौथा टी-२० सामना
 • २० मार्च – पाचवा टी-२० सामना

           (सर्व टी-२० सामने अहमदाबादच्या मैदानावर खेळवण्यात येतील)

——————————————————————————-

 • २३ मार्च – पहिला वन डे सामना
 • २६ मार्च – दुसरा वन डे सामना
 • २८ मार्च – तिसरा वन डे सामना

           (सर्व वन-डे सामने पुण्याच्या मैदानावर खेळवण्यात येतील)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 7:07 pm

Web Title: england tour of india 2021 schedule india vs england series nck 90
Next Stories
1 IND vs ENG : हार्दिक, इशांतचं पुनरागमन; इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड
2 ऑस्ट्रेलियावरील ऐतिहासिक विजयानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…
3 “भारतीय संघाने मराठमोळ्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली…”; अजित पवारांचं खास ट्विट
Just Now!
X