News Flash

जोकोव्हिचच्या बालेकिल्ल्याला थीम खिंडार पाडणार?

आठव्या जेतेपदासह अग्रस्थानाचे लक्ष्य

(संग्रहित छायाचित्र)

 

जागतिक टेनिस क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच हा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील ‘अनभिषिक्त सम्राट’. मेलबर्न पार्कवर एकही अंतिम लढत न गमावणाऱ्या जोकोव्हिचच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचे आव्हान क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमपुढे असेल. उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर विराजमान असलेल्या स्पेनच्या राफेल नदालचे आव्हान मोडीत काढल्यामुळे थीमने अपेक्षा उंचावल्या आहेत.

जोकोव्हिच ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेचा गतविजेता आहेच, पण गेल्या १२ लढतींत त्याने येथे पराभव पाहिलेला नाही. इतकेच नाही तर विक्रमी आठवे ऑस्ट्रेलियन ग्रॅँडस्लॅम पटकावण्याचे त्याचे लक्ष्य आहे. जोकोव्हिचने हे जेतेपद जिंकल्यास नदालला मागे टाकून जागतिक टेनिसमध्ये पुन्हा एकदा अग्रस्थान त्याला मिळवता येणार आहे.

थीमने गेल्या विविध स्पर्धामधील पाच लढतींमध्ये चार वेळा जोकोव्हिचला नमवले आहे. २६ वर्षीय थीमच्या खात्यावर अजून एकही ग्रॅँडस्लॅम जमा नसला तर टेनिसच्या कोर्टावर जलद खेळासाठी तो ओळखला जातो. नदालला नमवून थीमने आपली दावेदारी मजबूत केली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यापूर्वी थीमचे यश हे २०१८ आणि २०१९ या फ्रेंच ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपविजेतेपदांपर्यंत मर्यादित आहे.

* सामन्याची वेळ : दुपारी २ वा.

* थेट प्रक्षेपण : सोनी टेन ३

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 1:55 am

Web Title: final match novak djokovic vs dominican theme abn 97
Next Stories
1 Australian Open : सोफिया केनिनने पटकावलं विजेतेपद
2 Union Budget 2020 : क्रीडा खात्याच्या पदरी निराशा, अनेक महत्वाच्या संस्थाच्या निधीत कपात
3 पंतला संधी नाकारल्यामुळे सेहवाग नाराज, टीम इंडियाच्या संघनिवडीवर उभं केलं प्रश्नचिन्ह
Just Now!
X