देशाच्या फुटबॉल इतिहासात क्रांती घडवून आणणाऱ्या इंडियन सुपर लीगमध्ये परदेशी खेळाडूंचा सहभाग आहे. विश्वचषकापासून ते अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या या दिग्गज परदेशी खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा देशातील युवा फुटबॉलपटूंना होणार आहे. आयएसएलमुळे देशातील फुटबॉलला चालना मिळेल आणि भविष्यात भारताचा सक्षम संघ तयार होईल, अशी आशा इंडियन सुपर लीगमधील मुंबई सिटी एफसीचा खेळाडू अभिषेक यादव याने सांगितले. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) आणि फुटबॉल माईंडतर्फे पोर्टल तयार करण्यात आले असून हे पोर्टल म्हणजे महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांना जोडणारा दुवा ठरणार आहे. या पोर्टलवर ३२ जिल्ह्यांना स्वत:चे वेब पेज तयार करता येणार असून खेळाडूंना तसेच प्रशिक्षकांना आपली माहिती, फोटो, आगामी सामने याची नोंद या पोर्टलवर करता येणार आहे.