News Flash

French Open Badminton : श्रीकांतची उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक

हाँगकाँगच्या वॉंग विंग याचा केला पराभव

French Open Badminton : श्रीकांतची उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक

पॅरिस येथे सुरु असलेल्या French Open Badminton स्पर्धेत आज भारताचा आघाडीचा बॅडमिंटपटू किदम्बी श्रीकांत याने विजय मिळवला. हाँगकाँगचा खेळाडू वॉंग विंग याला श्रीकांतने २१-१९,२१-१३ अशी धूळ चारली आणि स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

पहिल्या गेममध्ये दोघांमधील सामना अगदी अटीतटीचा झाला. एक वेळ अशी होती जेव्हा श्रीकांतला गेम गमवावा लागतो कि काय असा प्रश्नही चाहत्यांच्या मनात आला. पण मोक्याच्या क्षणी योग्य फटके खेळत श्रीकांतने पहिला गेम खिशात घातला. दुसऱ्या गेममध्येही ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळणार, अशी चाहत्यांना आशा होती. पण तसे झाले नाही. दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने आधीच्या गेममध्ये केलेल्या चुका टाळत २१-१३ अशी सहज मात दिली आणि सामना जिंकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2018 9:09 pm

Web Title: french open badminton tournament kidambi srikant advances to pre quarter finals of mens singles defeating wong wing ki of hong kong 21 19 21 13 in paris
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : बंगळुरु बुल्सचे सामने पुण्याच्या मैदानात हलवले
2 Ind vs WI : शतकी खेळीदरम्यान विराट कोहलीने मोडले तब्बल 20 विक्रम, जाणून घ्या…
3 BLOG : भारताचा नवीन सचिन बनण्याकडे विराटची वाटचाल
Just Now!
X