भारताच्या गीता फोगटने दोहा येथे सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली, मात्र पुरुषांमध्ये हितेंदर बेनीवाल याचे पदक हुकले.  गीता हिने ५८ किलो गटात व्हिएतनामच्या तिलोन निग्वेन हिच्यावर सहज विजय मिळविला. तिने या सामन्यात चार तांत्रिक गुणांसह नऊ गुणांची कमाई केली. तिच्या आक्रमक खेळापुढे निग्वेन हिला फारसा प्रभाव दाखविता आला नाही.
गीता हिने पहिल्या फेरीत उजबेकिस्तानच्या सलोमात कुचीमोवा हिच्यावर ११-० असा दणदणीत विजय मिळविला. पाठोपाठ तिने चीनच्या तिंग झांगझुओ हिला ६-४ असे हरविले. मात्र नंतर उपान्त्य फेरीत तिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या काओरी इचो हिच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. या लढतीत गीताला एकही गुण मिळविता आला नाही. इचो हिने आठ तांत्रिक गुणांसह पंधरा गुण मिळवीत एकतर्फी लढत जिंकली. गीता हिला त्यानंतर रिपेज फेरीद्वारे कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळाली व या संधीचा लाभ घेत तिने पदकावर नाव कोरले.
 हितेंदरला १२५ किलो गटामध्ये कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत कझाकिस्तानच्या एआल लाझारेव्हने सहज हरविले. लाझारेव्ह याने आठ तांत्रिक गुणांसह १३ गुणांची कमाई केली.  भारताच्या राहुल आवारे (५७ किलो), रजनीश दलाल (६५ किलो) व सोमवीर (८६ किलो) यांनी आपापल्या गटात निराशाजनक कामगिरी केली.

candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार