News Flash

ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलला सुवर्ण

ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलने तिसऱ्या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले

संग्रहित छायाचित्र

ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलने तिसऱ्या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि प्रशिक्षक शिमॉन शरीफ यांच्या पुढाकाराने ऑनलाइन नेमबाजी स्पर्धा तिसऱ्यांदा यशस्वीपणे पार पडली. त्यामध्ये जवळपास १०० नेमबाज सहभागी झाले होते.

रुद्रांक्षने १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत २५२.९ गुणांचा वेध घेत सुवर्णपदकावर नाव कोरले. पहिल्या १० नेमनंतरही रुद्रांक्ष १०५.७ गुणांसह आघाडीवर होता. ती आघाडी त्याने अखेपर्यंत टिकवली. या प्रकारात भारताच्या यश वर्धनने २५०.८ गुणांसह रौप्यपदक मिळवले. फ्रान्सच्या एथिन गेरमाँडने २२८.५ गुणांसह कांस्यपदक मिळवले. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात यशस्विनी देस्वालने २४३.८ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले. गौरव राणाने २४०.६ गुणांसह रौप्यपदक आणि मनू भाकरने २१८.३ गुणांसह कांस्यपदक मिळवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 3:00 am

Web Title: gold to rudranksha patil of thane abn 97
Next Stories
1 युवीचा ‘तो’ विक्रम कोण मोडणार? के एल राहुल म्हणतो…
2 भारतात होणाऱ्या फुटबॉल महिला विश्वचषकाच्या नव्या तारखा जाहीर
3 “…तेव्हा रागाच्या भरात धोनीने बॅट फेकून दिली होती”, इरफान पठाणने सांगितला किस्सा
Just Now!
X