विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. विश्वचषकात उपांत्य फेरीतून माघारी परतावं लागल्यानंतर भारताने विंडीज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला पराभवाचं पाणी पाजलं आहे. यानंतर भारताला घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजचा सामना करायचा आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली. या संघनिवडीत युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला वगळण्यात आलेलं आहे.

निवड समितीच्या या निर्णयावर सोशल मीडियावर चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतला संधी मिळूनही त्याची कामगिरी सुधरत नसल्यामुळे बांगलादेशविरुद्ध मालिकेत सॅमसनची संघात निवड झाली होती, मात्र त्याला अंतिम संघात खेळायला मिळालं नाही. काँग्रेसचे लोकसभा खासदार शशी थरुर यांनीही सॅमसनला वगळण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं. यावर हरभजन सिंहनेही आपलं मत व्यक्त करत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला भारताची निवड समिती बदलण्याची मागणी केली आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ – (टी-२० मालिकेसाठी संघ)

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, दिपक चहर, भुवनेश्वर कुमार</p>

(वन-डे मालिकेसाठी संघ)
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, दिपक चहर, भुवनेश्वर कुमार