News Flash

Video : शॉट खेळला पण क्रीजमध्ये यायलाच विसरला… पहा विचित्र ‘रन आऊट’

चेंडू खेळून झाल्यावर फलंदाज अगदी रमत-गमत क्रीजमध्ये जात होता, तेव्हा...

भारतात सुरू असलेल्या देवधर करंडक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात भारत ब संघाने भारत अ संघावर मात केली. भारत ब संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ३०२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारत अ संघाला मात्र १९४ धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यात भारत अ संघाकडून खेळताना एक फलंदाज गमतीशीर पद्धतीने बाद झाला.

भारत अ संघ पराभवाच्या छायेत होता. त्यांना विजयासाठी बऱ्याच धावांची गरज होती. त्या वेळी भारत अ संघाकडून नवव्या क्रमांकावर जयदेव उनाडकट खेळायला आला. त्याने ६ चेंडूत १ धाव केली होती. सातवा चेंडू खेळताना तो चेंडू टोलवण्यासाठी पुढे आला. चेंडू खेळून झाल्यावर तो चक्क क्रीजमध्ये परत जायलाच विसरला. चेंडू खेळून तो अगदी रमत गमत क्रीजमध्ये जाणार इतक्यात फिल्डरने चेंडू कीपरकडे फेकला आणि उनाडकट बाद झाला.

दरम्यान, सामन्यात महाराष्ट्राचा उदयोन्मुख खेळाडू ऋतुराज गायकवाडच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर, भारत अ संघाने श्रीलंका अ संघावर ४८ धावांनी मात केली आहे. ऋतुराजने १३६ चेंडूत नाबाद १८७ धावा केल्या. त्याच्या या खेळीत २६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारत अ संघाने ३१७ धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेचा संघ २६९ धावांपर्यंत मजल मारु शकला.

सलामीवीर शुभमन गिल माघारी परतल्यानंतर ऋतुराज गायकवाडने अनमोलप्रीत सिंह आणि इशान किशन यांच्यासोबत महत्वाच्या भागीदारी रचल्या. ऋतुराजने लंकेच्या सर्वच गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. त्याच्यावर अंकुश लावण्याचं काम एकाही श्रीलंकन गोलंदाजाला जमलं नाही. लंकेकडून लहिरु कुमाराने ३ तर अशन प्रियंजनने १ बळी घेतला.

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या श्रीलंका अ संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर निरोशन डिकवेला आणि सदिरा समरविक्रमा हे ठराविक अंतराने माघारी परतले. मधल्या फळीत भनुका राजपक्षे आणि सेहन जयसुर्या यांनी भारतीय गोलंदाजांना चांगली झुंज दिली. जयसूर्याने १०८ धावांची नाबाद शतकी खेळी केली. मधल्या फळीत दसुन शनका आणि इतर फलंदाजांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. भारताकडून मयांक मार्कंडने २ बळी घेतले. त्याला तुषार देशपांडे, संदीप वारियर, शिवम दुबे आणि दिपक हुडा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 4:32 pm

Web Title: hilarious run out jaydev unadkat played shot forget to go back in crease laughter deodhar trophy india a india b vjb 91
Next Stories
1 दिया मिर्झा बीसीसीआयवर भडकली, जाणून घ्या कारण…
2 ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीला दिग्गजांची हजेरी? BCCI लागलं तयारीला
3 कर्णधारपदाबद्दल रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला….
Just Now!
X