हॉकी इंडियाने आगामी २०१८ वर्षासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बंगळुरु येथे पार पडल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिबीरासाठी ३३ खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे. या संघात भारतीय संघाचा गोलकिपर पी. आर. श्रीजेशने पुनरागमन केलं आहे. २०१७ साली अझलन शहा हॉकी स्पर्धेदरम्यान पी. आर. श्रीजेशला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे श्रीजेश जवळपास वर्षभर संघाच्या बाहेर होता.
मात्र या दुखापतीमधून श्रीजेश आता सावरला असून त्याला राष्ट्रीय शिबीरासाठी संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. याव्यतिरीक्त श्रीजेशच्या अनुपस्थितीत आकाश चिकटे, सुरज करकेरा, क्रिशन पाठक यांनाही संघात जागा देण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय शिबीरासाठी निवड झालेल्या भारतीय खेळाडूंची नावं –
गोलकिपर – आकाश चिकटे, सुरज करकेरा, पी. आर. श्रीजेश, क्रिशन पाठक
बचावपटू – हरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, दिप्सन तिर्की, वरुण कुमार, रुपिंदरपाल सिंह, बिरेंद्र लाक्रा, सुरेंदर कुमार, गुरिंदर सिंह, निलम संजीप क्सेस, सरदार सिंह
मधली फळी – मनप्रीत सिंह, चिंगलेन साना सिंह, एस. के. उथप्पा, सुमीत, कोठाजीत सिंह, सतबीर सिंह, निलकांत शर्मा, सिमरनजीत सिंह, हरजीत सिंह
आघाडीची फळी – एस. व्ही. सुनील, आकाशदीप सिंह, मनदीप सिंह, ललित उपाध्याय, गुरजंत सिंह, रमणदीप सिंह, अरमान कुरेशी, अफ्फान युसूफ, तलविंदर सिंह, सुमीत कुमार
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 3, 2018 5:00 pm