इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेवर सध्या सर्व स्तरातून टीका केली जात आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे आतापर्यंत ४ सामने हे रद्द करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर प्रत्येक क्रिकेटप्रेमी आयसीसीच्या नियोजनावर ताशेरे ओढत आहे. मात्र विश्वचषकाचं यजमानपद हे कसं ठरवलं जातं याबद्दलची प्रक्रीया ही मोठी आहे. त्यामुळे पावसामुळे सामने रद्द होत असल्यास ICC ला दोष देता येणार नाही.

२०१९ च्या विश्वचषकाचं यजमानपद इंग्लंडला देण्याचा निर्णय हा २००६ साली एप्रिल महिन्यातच घेण्यात आला होता. आयसीसीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व देशांच्या प्रमुखांची ३० एप्रिल २००६ रोजी बैठक झाली होती. या बैठकीत २०१९ पर्यंतच्या यजमानपदाचा निर्णय घेण्यात आला होता.

अवश्य वाचा – भारताशी खेळू पण ताठ मानेने, पाकिस्तानची मुजोरी कायम

१९८३ पासून विश्वचषकाच्या यजमानपदासाठी आयसीसीने Rotational Policy अवलंबली होती. या नियमाअंतर्गत जगभरात क्रिकेट खेळणाऱ्या खंडातील देशांना २० वर्षांनी एकदा आयोजनाचा हक्क मिळत होता. मात्र आयसीसीमध्ये BCCI च्या प्राबल्यामुळे हा नियम शिथील करण्यात आला. २०११ च्या विश्वचषकाचे अधिकार हे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र भारत-श्रीलंका-पाकिस्तान-बांगलादेश यांनी आयसीसीला जास्त नफा मिळवून देण्याचं आश्वासन दिल्यामुळे हे अधिकार भारत-बांगलादेश-श्रीलंका यांच्याकडे देण्यात आले होते. यानंतर २०१५ च्या विश्वचषकाचे यजमानपदाचे हक्क ऑस्ट्रेलियाकडे तर २०१९ च्या विश्वचषकाचे हक्क इंग्लंडकडे देण्यात आले होते.

अवश्य वाचा – शास्त्री गुरुजींना BCCI कडून बक्षीस, प्रशिक्षकपदावर मुदतवाढ

२०१९ विश्वचषकानंतर २०२३ साली होणाऱ्या विश्वचषकाचं यजमानपद पुन्हा एकदा भारताकडे देण्यात आलं आहे. मात्र २०२७ च्या यजमानपदाबद्दल अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाहीये.

अवश्य वाचा – धोनीचे चाहते आहात?? हे हॉटेल तुम्हाला देतंय फुकटात जेवण